बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान नेहमीच चर्चेत असतो. मागील काही महिन्यापासून आमिर खान त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गुरुवारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आमिर खानचा प्री-बर्थडे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्याच्या आयुष्याशी संबधित मोठा खुलासा केला. बऱ्याच महिन्यांपासून आमिर खानचे नाव गौरीशी जोडले जात होते. त्या संदर्भात अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खानने त्याच्या प्रेयसी गौरीला मीडियासमोर ओळख करून सर्वांना आश्चर्यचकित केले. प्री-बर्थडे कार्यक्रमात आमिर खानने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले आहे. आमिर दीड वर्षापासून गौरीला डेट असून त्यांची 25 वर्षांपासूनची मैत्री आहे.
कोण आहे गौरी?
आमिर खान व गौरी एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करत आहेत. गौरी ही मूळची बंगळुरूची असून, ती सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये काम करत आहे. गौरीला सहा वर्षाचा मुलगा आहे. आमिर खानने गौरीसोबतच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
आमिरखानचा दोनवेळा घटस्फोट झाला.
आमिर खानचे पहिले लग्न 1986 मध्ये रीना दत्तासोबत झाले होते. परंतु 2002 मध्ये दोघेही वेगळे झाले. रीना दत्ता आणि आमिर खान यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रीना दत्तासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान आणि किरण राव एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर, दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. दोघांनाही आझाद नावाचा मुलगा आहे. 11 वर्षाच्या नात्यानंतर आमिर खान आणि किरण राव देखील वेगळे झाले आहेत.