Aamir Khan  Team Lokshahi
मनोरंजन

आमिर खान बनणार गुलजार यांचा नवा शेजारी?

अभिनेता आमिर खान सध्या आपल्या 'लाल सिंह चड्ढा' या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत

Published by : Akash Kukade

बॉलिवूड अभिनेता तसेच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) सतत आपल्या हटके गोष्टींमुळे चर्चेत असतो. आता आमिर 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता आमिर खान सध्या आपल्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचं 'कहानी' हे पहिलं गाणं रिलीज झालं असून आमिरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे.

आमिर बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीसोबतच आमिर त्याच्या नवीन घराच्या शोधात व्यस्त आहे. नवरोज बिल्डिंग हे मुंबईतील (Mumbai) सर्वात आलिशान बांधकामांपैकी एक आहे. जे आगामी काळात पाली हिल्सचा भाग असेल. पाली हिल अजूनही अभिनेता आमिरच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे आणि कदाचित कायम राहील.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान गुलजार (Gulzar) यांच्या बंगल्याच्या शेजारी असलेल्या नवरोजमध्ये अपार्टमेंट शोधत आहे. आमिरला मरिना किंवा बेला व्हिस्टा या इमारतीत जास्त काळ राहायचं नाही हे स्पष्ट झालं आहे. मात्र, अभिनेता नवरोजमध्ये गुंतवणुकीसाठी अपार्टमेंट शोधत असेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. नुकतंच आमिर खानने कार्टर रोडवरील फ्रिडा वन बिल्डिंगमध्ये भाड्याने फ्लॅट खरेदी केला आहे.

आमिर खानच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, तो त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यापूर्वी हा चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता 11 ऑगस्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर आणि शर्मन जोशी दिसणार आहेत.चाहते आमिरला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर