Nikhat Khan Lokshahi Team
मनोरंजन

Aamir Khan : आमिरची बहीण निखत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

Published by : prashantpawar1

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' नामांकित असणारा निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आपल्या कुटुंबियांबद्दल नेहमीच चर्चित असतो. अभिनयाच्या बाबतीत भूमिका कुठलीही त्याने आजवर आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना भुरळ घातलेली आहे. '3 इडियट्स' (3 idiots) मध्‍ये एका विद्यार्थ्‍याची भूमिका साकारत प्रेक्षकांना प्रेरणा देण्‍याची असो किंवा 'पीके'मध्‍ये एलियनची भूमिका करून लोकांना माणुसकीचा धडा शिकवणे असो आमिरने आपल्या प्रत्येक पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रभावित केलेलं आहे. पडद्यामागे आमिर खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये 'लगान', 'हम हैं राही प्यार के', 'तुम मेरे हो' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र आता तो टीव्हीच्या दुनियेत आपल्या दमदार अभिनयाचा प्रसार करण्यास सज्ज झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार 59 वर्षीय निखत खान डिस्ने प्लस हॉटस्टार शो 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी'च्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. प्रसिद्ध टीव्ही निर्माता शशी मित्तल यांच्या शोमध्ये उल्का गुप्ता आणि प्रवेश मिश्रा प्रमुख भूमिकेत असून निखत सहाय्यक भूमिकेत असणार आहे. त्यांच्याशिवाय राजेंद्र चावला, हर्ष वशिष्ठ, विशाल पुरी, पार्वती सहगल, आयुष आनंद, पूजा सिंग यांसारखे स्टार्सही दिसणार आहेत. 'बनी चाऊ होम डिलिव्हरी' हा शो खरे तर 'खुकुमोनी होम डिलिव्हरी' चे हिंदी रूपांतर आहे जो बंगाली चॅनल स्टार जलसामध्ये लोकांचे मनोरंजन करत असे. त्याची कथा एका अनाथ मुलीभोवती फिरते जी पैसे कमावण्यासाठी घरोघरी अन्न पोहोचवते. जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की निखत खान टीव्हीवर डेब्यू करण्यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामध्ये 'मिशन मंगल', 'सांड की आँख', 'तान्हाजी' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : व्यवसाय सल्लागार समितीची बैठक सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

Kalyan Girl Assault : 'कपडे फाडले, तोंडावर लाथ मारुन खाली आपटलं' कल्याणमध्ये महिला कर्मचारीला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Donald Trump : "...तर आम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेवर घाव घालू" अमेरिकनची भारत, चीन, ब्राझीलला धमकी

Nashik News : "आई, तुला त्रास द्यायचा नाही पण..." नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुलींनी उचललं टोकाचं पाऊल, थक्क करणार कारण समोर!