मनोरंजन

योद्धाच्या प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारे बलोच'मधील 'आस खुळी' प्रेमगीत प्रदर्शित

मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा 'बलोच' या चित्रपटाविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा 'बलोच' या चित्रपटाविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या टिझरनंतर या चित्रपटातील पहिले प्रेमगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. 'आस खुळी' असे या गाण्याचे बोल असून या श्रवणीय गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबद्ध केले आहे. तर मनातील भावना अभिव्यक्त करणाऱ्या या सुमधुर गाण्याला गुरु ठाकूर यांचे शब्द लाभले असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बलोच'च्या पोस्टर, टीझरमध्ये प्रवीण तरडे एका लढवय्याच्या रूपात दिसत आहेत. तर या गाण्यात त्यांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळत आहे. तर स्मिता गोंदकरही या गाण्यातून पहिल्यांदाच अशा अंदाजात दिसत आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या प्रेमगीतात नजरेतून प्रेमाच्या तरल भावना व्यक्त होत असून मिश्र भावनांचं सुरेख गुंफण दिसत आहे. नवरा -बायकोमधील विलक्षण प्रेम मनाला भावणारे आहे. एकाच वेळी आपल्या योद्धा नवऱ्याला खंबीर पाठिंबा देत असतानाच स्वारीवर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या नवऱ्याला निरोप देताना अस्वथ झालेली पत्नीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ''बलोच चित्रपटातील पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झालं आहे. हे गाणं खूपच श्रवणीय असून श्रेया घोषाल यांच्या आवाजानं या गाण्याला चारचाँद लागले आहेत. आपल्या राष्ट्रासाठी लढणाऱ्या लढवय्याचे एक कुटुंबही असते, ज्यांना मागे सोडून ते राष्ट्रासाठी आपले प्राण पणाला लावतात. हे एक संवेदनशील प्रेमगीत आहे. युद्धभूमीत लढणारे योध्ये जेवढे महत्त्वाचे असतात तितकीच घरी वाट पाहणारी त्यांची पत्नीही महत्वाची असते. त्यांचा पाठिंब्याशिवाय हे होणं शक्य नाही'.

विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत, प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे, स्मिता गोंदकर यांच्यासह अशोक समर्थ यांचीही प्रमुख भूमिका आहे. ५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....

Maharashtra Top In Digital Payment : UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Gatari 2025 Special Non- veg Recipe: गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

Akkalkot : छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते आक्रमक; अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं