अभय ‘ABHAY' या सिझनच्या पहिल्या व दुसऱ्या सीझनला चाहत्यांनी खूप पसंत केले. नुकताच या सिरीजचा तिसरा सीझन झी फाइव्ह Z5 या प्लॅटफॉर्मवर आला आहे. या सीरिजमध्ये कुणाल खेमू KUNAL KHEMU पुन्हा एकदा सुपर कॉप SUPER COP अभय प्रताप सिंग या सिरीजच्या नायकाच्या रूपांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सीरिजमध्ये सिरीयल किलिंग कोन करतोय? ही केस आपल्याला सोडवताना दिसतील. त्याच बरोबरीने त्यांचा एक असा भूतकाळ आहे व वर्तमानकाळ आहे. त्यांच्या जीवनामध्ये सध्या अनेक समस्या आहेत. त्याच्याशी ते सामना करत आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे तिला मारले आहे की आणि काही याबाबत ते साशंक आहेत. दुसरीकडे त्यांचा मुलगा त्यांच्याशी बोलत नाही. ते आपल्या कामातील व्यापामुळे आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नाही.
या सीरिजमध्ये कुणाल खेमू ह्याने उत्तम अभिनय केला आहे. त्याचबरोबरीने अवस्थी हे पात्र देवेंद्र चौधरी याने छान पद्धतीने रंगवले आहे. तर विजय राज VIJAY RAJ यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपले पात्र साकारले आहे. तो जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतो त्यावेळी त्याचे पात्र उठून दिसते. सर्व कलाकारांमध्ये त्याचा अभिनय उजवा ठरतो.
या सीरिजमध्ये एक डायलॉग आहे, “अनंत का एक सिरा जन्म और एक सिरा मृत्यु. हम इसी पुनर्जन्म के अनंत चक्कर में घूमते रहते हैं." या एकाच वाक्यावर संपूर्ण सिरीज आधारलेली आहे. हा शो आपल्या या डायलॉग ला जस्टीफाय सुद्धा करतो. ज्या सिक्वेन्स मध्ये हा सुरू होतो पुन्हा त्याच सिक्वेन्स ला येऊन संपतो. व आपल्या नवीन सीझनसाठी शोच्या शेवटाकडे येऊन नवीन सीजन साठी दार उघडे करतो.