Abhishek Bachchan Team Lokshahi
मनोरंजन

Abhishek Bachchan : ‘घूमर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

‘घूमर’ या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) अगामी ‘घूमर’ (Ghoomer) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातचं या ‘घूमर’ या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत सैयामी खेरही (Saiyami Kher) मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सैयामीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केले आहे. यामुळे आता प्रेक्षक हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे लक्ष लावून बसले आहेत.

या चित्रपटामध्ये अभिषेक आणि सैयामी हे प्रमुख भुमिकेत असणार आहेत. तसेच हे दोघे रोमान्स करताना दिसणार आहे. सैयामीने तिच्या सोशल मिडियावर (Social Media) या चित्रपटाचा फर्स्ट लूक (First Look) शेअर केला आहे. चित्रपटाचा पोस्टर शेअर करताना सैमानीने लिहिले...,‘मी ज्या लोकांना भेटले, त्यापैकी काही चांगल्या लोकांसोबतचा हा माझा प्रोजेक्ट आहे. मला जे आवडते, तेच मला या लोकांनी करू दिले. आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारण्याची मला त्यांनी संधी दिली.

‘घूमर’ या चित्रपटामध्ये सैयामी एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिषेक या चित्रपटामध्ये कोची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. ‘घूमर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की (R. Balki) करणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : साखरपुड्यावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला! ; चिमुरडा गंभीर तर वधूला...

Latest Marathi News Update live : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

RBI's Big Decision : ग्रामीण भागातील कर्ज प्रक्रिया सुलभ; RBI कडून मोठा निर्णय

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा