Ajay & Abhishek
Ajay & Abhishek Team Lokshahi
मनोरंजन

Abhishek Bachchan : अजयमुळे अभिषेकवर आली ही वेळ, वाचा सविस्तर....

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांचा सिनियर आहे परंतु दोघेही सुरुवातीपासून खूप चांगले मित्र आहेत. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन दोघेही अनेकदा एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहोत की एक वेळ अशीही आली होती की अजय देवगणमुळे अभिषेक बच्चनला रात्र रस्त्यावर झोपून काढावी लागली होती.

खरंतर अजयची आणि अभिषेकची मैत्री 1998 साली झाली होती. त्यावेळी मेजर साब या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन प्रोडक्शन बॉय म्हणून काम करत होता. या चित्रपटाचं एक गाणं ऑस्ट्रियामध्ये चित्रीत होणार होते. प्रॉडक्शन बॉय असल्याने अभिषेक बच्चनला अजय देवगणला विमानतळावरून उचलून हॉटेलमध्ये थांबवावे लागले.

मात्र अजय देवगण हॉटेलमध्ये पोहोचताच तो ड्रिंक घेण्यासाठी खाली गेला आणि त्याने अभिषेकला ड्रिंक ऑफर केली होती मात्र त्याने त्यावेळी नकार दिला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी अजय देवगणने पुन्हा अभिषेकला ड्रिंक ऑफर केली. त्यावेळी अभिषेक म्हणाला की जर मी माझ्या वडिलांना याबद्दल सांगितले नाही तरच मी पिण्यास तयार आहे. यानंतर एका मुलाखतीत अभिषेकने अजय देवगणसोबत ड्रिंक घेण्याचे खरे कारण सांगितले.

अजय देवगणसाठी रूम बुक करायला विसरलो

अभिषेकने सांगितले की प्रॉडक्शन बॉय झाल्यानंतर त्याच्याकडून सतत चुका होत असायच्या. सुरुवातीला तो अजय देवगणला विमानतळावरून हॉटेलपर्यंत नेण्यासाठी कार बुक करायला विसरला होता. त्यानंतर टॅक्सीने हॉटेलमध्ये पोहोचताच त्याला आठवले की त्याने अजय देवगणसाठी रूमही बुक केली नव्हती. यानंतर अभिषेक बच्चनने आपले सामान खोलीबाहेर काढले आणि खोली अजय देवगणला दिली. यामुळे त्यांना ती रात्र हॉटेलबाहेरील फुटपाथवर काढावी लागली.

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना