Abhishek Bachchan Lokshahi Team
मनोरंजन

Abhishek Bachchan : OTT बद्दल अभिषेकने केला खुलासा....

एका चर्चेदरम्यान अभिषेक OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोलत असताना काही गोष्टी उघड...

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachhan) यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन(Abhisek Bachhan) प्रदीर्घ कालावधीपासून OTT प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाच्या छटा उमटवत आहे. ओटीटीने अभिषेकच्या कारकिर्दीला एक नवीन उड्डाण दिली असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. कोरोना काळात त्याचे शेवटचे पाच चित्रपट सतत OTT वर प्रदर्शित होत आहेत. 2020 मध्ये 'लुडो' या चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दसवी' या चित्रपटापर्यंत कधी पोहोचला ते कोणालाच कळले नाही. जसजसा कोरोनाचा भयंकर प्रभाव जगातून कमी होऊ लागला आहे. तसच हळूहळू मनोरंजन विश्वही अगदी रुळावर येऊ लागले आहे.

मोठ्या पडद्यावर चित्रपटांचे पुनरागमन होत असतानाच बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. परंतु अभिषेक बच्चन ओटीटीवर त्याचे चित्रपट प्रदर्शित झाल्याबद्दल समाधानी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने त्याच्या OTT प्रवासाबद्दल अगदी मोकळेपणाने बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला.

अभिषेकच्या कारकिर्दीला बऱ्याच काळानंतर वेग आला आहे. ओटीटीवरील त्याच्या कामाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की त्याचे चित्रपट मोठ्या पडद्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याने त्याला कधी फरक पडला आहे का? यावर प्रतिक्रिया देताना 46 वर्षीय अभिषेकने सांगितले की "मी एक अभिनेता असून माझं काम अभिनय करणे हाच आहे. आम्हा सर्वांना मोठ्या पडद्यावर काम करायला आवडतं हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. परंतु मला वाटतं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर" असणे खूप फायदेशीर आहे. कारण OTT हे सिनेमा हॉलपेक्षा अनेक लोकांपर्यंत पोहोचले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

Mumbai Stock Exchange Bomb Threat : मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

Mumbai Rain Updates : मुंबईमध्ये पावसाचा कहर ; अनेक ठिकाणी साचलं पाणी