मनोरंजन

किशोरी शहाणे यांच्या गाडीला पुण्याजवळ अपघात; फेसबूक वर शेअर केली भावूक पोस्ट

Published by : Lokshahi News

किशोरी शहाणे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे सिनेसृष्टीला दिले. माहेरची साडी त्यांचा सिनेमा खूप गाजला. अलिकडेच आलेला त्यांचा क्लासमेट्स हा सिनेमाही गाजला. त्या मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाल्या होत्या.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये अपघात झाला आहे. गाडीला अपघात झाला असला तरी त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे. किशोरी शहाणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, "आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. 'जाको रखे सैया मार सके ना कोई'…".

किशोरी शहाणे या एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र किशोरी शहाणे यांची फेसबुक पोस्टमधले फोटो पाहता त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. किशोरी शहाणे मात्र या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर