मनोरंजन

अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवा सिनेमा

Published by : Lokshahi News

'फुलपाखरु' या मालिकेतून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.'अनन्या' या आगामी सिनेमातुन ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी 'अनन्या' हा चित्रपट निर्माण केला आहे.या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे.पोस्टरमध्ये हृताचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे.

अनन्या बद्दल हृता दुर्गुळे म्हणते, "मी खूपच खुश आहे. खरं तर या क्षणाची मी खूपच आतुरतेने वाट पाहात होते. कारण 'अनन्या' च्या माध्यमातून मी चित्रपटात पदार्पण करत आहे. कोरोनाचा शिरकाव होण्याआधीच या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते आणि मागील दीड -दोन वर्षांत सगळेच अडकून होते. मुळात दिग्दर्शक, निर्माता यांच्यासह आमच्या सर्वांचीच इच्छा होती की, 'अनन्या' थिएटरमध्येच रिलीज व्हावा. त्याचीच आम्ही वाट पाहात होतो. हळूहळू परिस्थिती निवळत असतानाच आता 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

RBI Repo Rate : रेपो दर कायम, कर्जदारांना दिलासा

Heart Attack : Nashik : सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली

Pune : पुण्यातील फुरसुंगीत गांजाची तस्करी; गुन्हे शाखेकडून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त