मनोरंजन

अभिनेता अजय देवगनला दुखापत, ''सिंघम अगेन'' च्या सेटवर अ‍ॅक्शन सीन शूट करताना जखमी

सिनेप्रेमींसाठी खुशखबर. "सिंघम", "सिंघम रिटर्न्स" नंतर आता रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटाचे शुटींगला सुरुवात केली आहे.

Published by : Team Lokshahi

सिनेप्रेमींसाठी खुशखबर. "सिंघम", "सिंघम रिटर्न्स" नंतर आता रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटाचे शुटींगला सुरुवात केली आहे. अजय देवगण 'सिंघम अगेन' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तो गंभीर जखमी झाला आहे. या सिनेमाच्या अॅक्शन सीक्वंसच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला दुखापत झाली आहे.

सूत्रांनुसार, एक अॅक्शन सीन शूट करताना चुकून एक झटका त्याच्या चेहऱ्यावर लागला, ज्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. शूटींग दरम्यान अजय देवगनने काही तासांचा ब्रेक घेतला आणि डॅाक्टरांकडून त्यावर उपचार करून पुन्हा नव्या जोमाने काम करण्यास सुरूवात केली.

'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटात अजय देवगनसह, करीना कपूर, आणि दिपीका पदुकोनला कास्ट केले आहे. त्यासोबतच सोनू सूद, जॅकी श्रॅाफ, रणवीर सिंह, आणि सिध्दार्थ जाधवसुध्दा भूमिका साकारत आहेत. या सिनेमातील कलाकारांचे पोस्टर आऊट झाल्यापासून 'सिंघम'चे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा