actor john abraham | New Film  team lokshahi
मनोरंजन

Tariq : अभिनेता जॉन अब्राहमने नवीन चित्रपटाची केली घोषणा

जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाची घोषणा

Published by : Shubham Tate

actor john abraham : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम एकापाठोपाठ एक त्याच्या चित्रपटांवरून पडदा टाकत आहे. आज स्वातंत्र्यदिनी अभिनेत्याने त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर केली आहे. 'पठान' आणि 'तेहरान'नंतर जॉन अब्राहमच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'तारिक'चाही समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच, अभिनेत्याने त्याच्या तेहरान चित्रपटाचा फर्स्ट लूक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. (actor john abraham announced his new film also lifted the curtain from the release date)

आज अभिनेत्याने त्याच्या आगामी 'तारिक' चित्रपटाचाही खुलासा केला आहे. जॉन अब्राहमने त्याच्या ट्विटर हँडलवरून पोस्टर शेअर केले आणि लिहिले, 'आझादी की तारिक, 15 ऑगस्ट 2023 'तारिक' हे 'बाटला हाऊस' आणि 'तेहरान' नंतर बेक माय केक फिल्म्ससोबतचे आमचे पुढील सर्जनशील सहकार्य आहे. या ट्विटमध्ये चांगल्या कथा सांगण्याचे स्वातंत्र्य तसेच हॅशटॅग 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्याची वेळ आली आहे.

या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. जो 15 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. जॉन अब्राहम शेवटचा 29 जुलै रोजी रिलीज झालेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालवू शकला नाही. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री दिशा पटानी देखील दिसले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या