मनोरंजन

अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रणव ज्वेलर्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्रिची येथील भागीदारी फर्म प्रणव ज्वेलर्स विरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात अभिनेता त्यांना समन्स बजावले आहे.

त्रिचीस्थित प्रणव ज्वेलर्सने उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली जनतेकडून १०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. कथित पॉन्झी स्कीम चालवल्याच्या आरोपावरून ईडीने सोमवारी या कंपनीवर छापा टाकला होता. सोमवारी छाप्यादरम्यान एजन्सीला अनेक कागदपत्रे सापडली, 23.70 लाख रुपयांची रोकड, 11.60 किलो वजनाचे सराफा/सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकाश राज हा प्रणव ज्वेलर्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते आणि या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा