मनोरंजन

Prasad Oak : अभिनेते प्रसाद ओक यांचा गौरव ; 'निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025' जाहीर

मराठी मनोरंजनात प्रसाद ओक यांचे विशेष स्थान, निळू फुले सन्मानाने गौरव

Published by : Shamal Sawant

प्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शक प्रसाद ओक यांना यंदाचा प्रतिष्ठित 'निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिग्गज अभिनेते असलेल्या निळू फुले यांच्या नावे असलेला हा सन्मान मराठी चित्रपट, रंगभूमी आणि समाजावर त्यांच्या कार्य आणि सामाजिक संवेदनशीलतेद्वारे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या कलाकारांना दिला जातो.

कॅमेऱ्यासमोर आणि मागे त्यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी आणि प्रभावी कथाकथनासाठी ओळखले जाणारे प्रसाद ओक यांनी मराठी मनोरंजनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कच्चा लिंबू आणि धर्मवीर सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयापासून ते हिरकणीसारख्या प्रशंसित प्रकल्पांमधील दिग्दर्शनापर्यंत प्रसाद ओक यांनी त्यांचा कामाची खास प्रतिभा दाखवली आहे.

या बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रसाद ओक म्हणतात " निळू फुलेंसारख्या दिग्गजाच्या नावावर असलेला पुरस्कार स्वीकारणे हा केवळ सन्मान नाही तर तो एक भावनिक क्षण आहे. त्यांच्या वारशाने मला नेहमीच अर्थपूर्ण भूमिका आणि लोकांशी बोलणाऱ्या कथा निवडण्याची प्रेरणा दिली आहे. हा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असणार आहे" हा पुरस्कार सोहळा 7 जून 2025 रोजी पुण्यात पार पडणार असून चित्रपट, नाट्य आणि साहित्य जगतातील प्रमुख व्यक्ती या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं समोर आलं आहे.

या सन्मानासह प्रसाद ओक अर्थपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक कलांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांच्या प्रतिष्ठित यादीत सामील झाले आहेत. येणाऱ्या काळात प्रसाद ओक अनेक वैविध्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांचा भेटीला घेऊन येणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा