Amanpreet Singh  Instagram
मनोरंजन

मोठी बातमी! अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत अटकेत; ड्रग्ज सेवन केल्यानं पोलिसांनी केली कारवाई

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंगला हैदराबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : Naresh Shende

Actor Rakupreet Singh Brother Aman Arrested: बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंगला हैदराबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ड्रग्ज प्रकरणात अमनवर अटकेची कारवाई झालीय. ड्रग्ज तस्करी प्रकरणात अमनप्रीत सिंगला अटक केल्याची माहिती, हैदराबाद पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलीय. हैदराबादच्या राजेंद्र नगर एसओटी पोलीस आणि नारकोटिक्स ब्यूरोनं संयुक्त कारवाई करत अन्य आरोपींनाही अटक केलीय.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमनला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अमनने ड्रग्जचं सेवन केलं होतं. अमनचा चाचणी अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. अमनशिवाय अन्य १२ जणांचा चाचणी अहवालही पॉजिटिव्ह आल्याचं समजते.

अमनने केलं होतं ड्रग्जचं सेवन

अमनने कोकेनचं सेवन केलं होतं. कोकेन सेवनाच्या टेस्टमध्ये अमनचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणात भारतीय तसचे नायजेरियन नागरिकांचाही समावेश आहे. अमनचा या आरोपींसोबत कशाप्रकारे संपर्क झाला, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत