अभिनेता शशांक केतकर आणि पत्नी प्रियांका यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर पोस्ट टाकत आपल्या घरी एक नवा पाहुणा लवकरच येणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज शशांक केतकर च्या घरून गुड न्यूज आली असून पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची पोस्ट सुद्धा शशांकने नुकतीच शेअर केली असून त्यामध्ये मुलाचं नाव ऋग्वेद असल्याचे सुद्धा त्याने जाहीर केला आहे. बाळा सोबतचा शशांक चा एक फोटो शेअर करत त्याला त्याने कॅप्शन ऋग्वेद शशांक केतकर असं दिलं आहेअभिनेता शशांक केतकरने त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून लोकप्रिय झालेला शशांक केतकर बाबा झाला आहे. शशांकच्या या फोटोवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.