मनोरंजन

‘बिग बॉस मराठी 2’ विजेता शिव ठाकरेच्या गाडीला भीषण अपघात

Published by : Lokshahi News

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे याच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शिव ठाकरेला दुखापत झाली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

बिग बॉस फेम शिव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह अमरावतीवरुन प्रवास करत होता. यावेळी वळगाव भागात त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. या अपघातात शिव ठाकरेसह त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले असून शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. आता त्यांची प्रकृती ठिक असून, तो अमरावती येथे घरी विश्रांती घेत आहेत. शिव ठाकरे, त्यांचे जावई, बहीण आणि भाचा हे कारने शनिवारी सकाळी अमरावती वरुन परतवाडा येथे कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोनं त्यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि अपघात झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताने टॉस जिंकून फलंदाजी निवडली

Jaipur Accident : जयपूरमध्ये भीषण अपघातात संपुर्ण कुटुंब उध्वस्त! हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत असताना...

Assam Earthquake : रशियानंतर आता आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?