Marathi Actor Subodh Bhave 
मनोरंजन

सुबोध भावेने दिल्या झुंड चित्रपटाला शुभेच्छा; सुबोध म्हणाला…

Published by : Vikrant Shinde

सध्या सोशल मीडियावर झुंड (Jhund) या नव्या हिंदी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. फँड्री, सैराट यासारखे दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या नागराज मंजुळेनं (Nagraj Manjule) या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. आज, 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपाटला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) काल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यानं पोस्टमध्ये नागराजचं कौतुक केलं आहे.

सुबोधची पोस्ट:
'नागराज तुझ्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा उद्या तू गाठतोयस, आमच्या पिढीचा तू महत्वाचा दिग्दर्शक आहेस आणि तुझ्या प्रत्येक चित्रपटाची उत्सुकता असते. चार मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या झुंड या तुझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी तुला मन:पूर्वक शुभेच्छा', या कॅप्शनसह सुबोधने झुंड चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे.

झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह नागराजच्याच 'सैराट' ह्या चित्रपटातील गाजलेली जोडी अर्थात, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि आमिर खान यांनी देखील चित्रपटाचे कौतुक केले होते. झुंड चित्रपटाची कथा ही स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा