मनोरंजन

'मायलेक' चित्रपटात अभिनेता उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला 'मायलेक' येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला 'मायलेक' येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. 'मायलेक'मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया आणि सोनालीसोबत दिसत आहेत. पोस्टर पाहाता 'मायलेक'मध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटात बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल उमेश कामत म्हणाला की, '' आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे. मी स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगणार नाही. मात्र एक नमूद करेन माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. सोनाली आणि सनायासोबत काम करायचा अनुभवही भन्नाट होता. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांना माहित आहेच परंतु सनाया मध्येही हे गुण आहेत. सनायालाही अभिनयाची उत्तम जाण आहे. ही 'मायलेक'ची जोडी भन्नाट आहे. रिअलमध्ये ही जोडी कमाल असल्याने रिलमध्येही ही केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे.''

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा