Team Lokshahi
मनोरंजन

Actors Expensive Watch: रणबीर कपूर घालतो सर्वात महागडे घड्याळ, किंमत ऐकून व्हाल धक्क

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत राहतात.

Published by : shweta walge

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत राहतात. प्रत्येक कलाकाराची स्वतःची शैली आणि स्वतःची वेगळी फॅशन सेन्स असते. बॉलीवूड स्टार शाही जीवन टिकवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. ते फक्त करोडो रुपयांना घर आणि गाड्या विकत घेत नाहीत. खरं तर, ते सर्वजण त्यांच्या हातावर घातलेल्या घड्याळांवर सुध्दा खूप पैसे खर्च करतात. आज आम्ही तुम्हाला अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे मौल्यवान घड्याळे घालतात.

रणबीर कपूर

रणबीर कपूर राजा-महाराजाप्रमाणे आयुष्य जगतो. तो कपूर खंदरचा मुलगा असून करोडोच्या मालमत्तेचा मालक आहे. त्याच्याकडे तीन महागड्या घड्याळ आहेत, ज्यामध्ये पहिले घड्याळ ऑडेमार्स पिगेट रोया आहे, त्याची किंमत 14 लाख रुपये आहे. दुसऱ्या घड्याळाचे नाव रेसेन्स टाइप 1 असून त्याची किंमत 14.18 लाख रुपये आहे. त्याच्याकडे रिचर्ड मिल RM 028 ऑटोमॅटिक रोझ गोल्ड डायव्हर देखील आहे, ज्याची किंमत 1.12 कोटी रुपये आहे.

शाहरुख खान

करोडोंच्या संपत्तीचा मालक शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. अभिनेत्याकडे रोलेक्सची तीन महागडी अल्ट्रा प्रीमियम घड्याळे आहेत. रोलेक्स डेटोना 116520 ही त्याची दोन घड्याळे आहेत. या एका घड्याळाची किंमत 8.51 लाख रुपये आहे.मात्र, आजच्या काळात या दोन्ही घड्याळांची किंमत दुपटीहून अधिक आहे. शाहरुखचे तिसरे महागडे घड्याळ रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना आहे, ज्याची किंमत 10.69 लाख रुपये आहे.

आमिर खान

आमिर खानलाही महागड्या घड्याळांचा शौक आहे. त्याच्याकडे Vacheron Constantin Overseas World Time नावाचे खास घड्याळ आहे जे चांदीचे आणि निळ्या रंगाचे आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ ३७ वेगवेगळे टाइम झोन सांगते. त्याची किंमत 27.80 लाख रुपये आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंग त्याच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो आणि याच कारणामुळे तो अनेकदा ट्रोलही झाला आहे. पण तरीही त्याच्या महागड्या घड्याळाबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्याच्याकडे फ्रँक मुलर V45 व्हॅन्गार्ड यॉटिंग रोझ गोल्ड आणि डायमंड घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत 40 लाख रुपये आहे.

सैफ अली खान

बॉलीवूड इंडस्ट्रीचा नवाब सैफ अली खानने सुरुवातीपासूनच आपलं आयुष्य खूप छान जगलं आहे. 52 वर्षीय सैफला अजूनही महागड्या वस्तूंचा शौक आहे. त्यांच्याकडे एक प्रकारचे घड्याळे आहेत, ज्यात एक Lange & Söhne Lange आणि Grande Lange 1 'Luminous' पांढर्‍या सोन्याच्या घड्याळाचा समावेश आहे. या दोन्ही घड्याळांची किंमत लाखांत आहे. Lange & Söhne Lange या घड्याळाची किंमत रु. 24.93 लाख आहे आणि Grande Lange 1 'Luminous' ची किंमत रु. 14.40 लाख आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा