मनोरंजन

ऐश्वर्या रायला कर थकवल्याप्रकरणी सिन्नर तहसीलची नोटीस

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास काजळे | इगतपुरी : ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे. कोट्यवधींची मालकीण असलेली ऐश्वर्या राय बच्चनला मात्र कर चुकवला आहे. कर थकवल्याप्रकरणी सिन्नरच्या महसुल विभागाने ऐश्वर्याला नोटीसही पाठवली आहे. ठानगाव परिसरातील आडवाडी येथील जमिनीचा 21 हजार 970 रूपये कर थकवल्याप्रकरणी सिन्नर तहसीलदारांनी ऐश्वर्या रायसह इतर गुंतवणूकदारांना नोटीस पाठवली आहे.

सिन्नर तालुक्यातील आडवाडी भागामध्ये असलेल्या डोंगराळ भागांमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसह बाराशे अकृर्षक मालमत्ता धारक असल्याचे समोर येत आहे. ठाणगाव जवळील आडवाडी येथील डोंगराळ भागात ऐश्वर्या राय बच्चनची एक हेक्टर 22 आर जमीन आहे. याचा 21 हजार 970 रुपये कराची थकबाकी आहे.

तसेच, पवनऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुजलॉन कंपनीत अनेक नेते आणि अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा समोर येत आहे. सिन्नर तहसीलला अकृर्षक मालमत्ता धारकांकडून वर्षाकाठी जवळपास एक कोटींचा महसूल अपेक्षित असून त्यापैकी 65 लाखांची वसुली बाकी आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचलल आहे. कर थकवल्याप्रकरणी सिन्नरच्या महसुल विभागाने ऐश्वर्याला नोटीसही पाठवली आहे.

थकबाकी दरामध्ये बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, मिटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, छोटा भाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड, एल बी कुंजीर इंजीनियरिंग, एस के शिवराज आयटीसी, मराठा लिमिटेड हॉटेल लीला वेंचर लिमिटेड, कुक्रेजा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ओ पी रामा हँडीक्राफ्ट लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट इंटरप्राईजेस कंपनी लिमिटेड यांचाही समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

आजचा सुविचार

Guru Purnima 2025: 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु...'; गुरुपौर्णिमा दिनानिमित्त आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा