मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेतील 'या' अभिनेत्रीने घेतलं नवीन घर

आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडने नुकताच मुंबईमध्ये तिच्या स्वप्नातलं घर घेतलं आहे. नुकताच अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे.

Published by : Team Lokshahi

मागच्या वर्षी अनेक कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातले घर खरेदी केले होते. यात अनेक कलावंत आहे. प्रसाद ओक, अश्विनी कासार, रूचिता जाधव, माधुरी पवार, अश्या अनेक कलाकार यामध्ये शामिल आहेत. नुकताच या कलाकारांमध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडने नुकताच मुंबईमध्ये तिच्या स्वप्नातलं घर घेतलं आहे.

अश्विनी महांगडची मैत्रीण माधुरी पोळने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अश्विनीच्या नव्या घराची झलक आणि त्यासोबतच घराची चावी असणारा फोटोदेखील शेअर केला आहे. नुकताच अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, 'प्रचंड स्वप्नं पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काय...... स्वप्नं पूर्ण होतातच. आज एक स्वप्न पूर्ण झालं', असे लिहित तिने स्वप्न पूर्ण झाल्याचा हॅशटॅगदेखील वापरले आहे.

सध्या अश्विनी 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अनघाची भूमिका साकारत आहे. लवकरच ही अभिनेत्री 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अश्विनीने याआधी 'अश्विनी स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमध्ये राणी अक्काची भूमिका साकारली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा