(Isha Talwar ) यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत तिने तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केली आहे. त्यावर ‘मिर्झापूर’ फेम ईशा तलवारने कमेंट केली असून या कमेंटची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री ईशा तलवार हिने यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांच्याशी संबंधित एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ईशाच्या म्हणण्यानुसार, ऑडिशनदरम्यान तिला एका रेस्टॉरंटमध्ये रडण्याचा सीन करायला सांगण्यात आला होता. ईशा म्हणाली की, "जेव्हा मी शानूसोबतच्या भूमिकांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तेव्हा मला मुंबईतील वर्सोवा येथील 'मिया कुसीना' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये एक सीन सादर करण्यास सांगण्यात आले. माझ्या टेबलाजवळ ग्राहक जेवत असलेल्या रेस्टॉरंटच्या मध्यभागी एक रडणारा सीन होता."
"मला सांगण्यात आले की, एक अभिनेता म्हणून मला कोणताही संकोच नसावा म्हणूनच मी सानू आणि त्याच्या काही सहाय्यकांसमोर बसून रडावे. ही एक गोंधळात टाकणारी विनंती होती. चित्रपटांमध्ये काम करणारी एक तरुणी म्हणून माझा आत्मविश्वास यामुळे खरोखरच तुटला. ऑडिशनसाठी चांगली कास्टिंग ऑफिसची जागा दिली असती तर चांगले झाले असते. किंवा जर तुम्हाला खरोखरच्या ठिकाणी सीन करायचा असेल तर जागा भाड्याने घ्या, त्यासाठी पैसे द्या आणि ऑडिशन द्या"
"असो, एका दशकानंतर, मी ही गोष्ट सर्व नवीन कलाकारांना सांगण्यासाठी शेअर करत आहे की त्यांना कोणताही दबाव जाणवू नये. मला आठवते की मी हे काम करू शकत नाही आणि अर्थातच मला कधीच ती भूमिका मिळाली नाही. पण या विचित्र मागणीला मी बळी पडले नाही आणि भूमिकेसाठी रेस्टॉरंटमध्ये रडले नाही." असे ईशा तलवार म्हणाली.