मनोरंजन

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत अभिनेत्री किशोरी आंबिये दिसणार एका नव्या भूमिकेत

कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार

Published by : Siddhi Naringrekar

कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसतायेत. कॉलेजच्या प्राध्यापिकेची भूमिका त्या यात साकारत आहेत. पद्मिनी गाडगीळ असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा यात साकारत आहेत. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांत वेगळ्या शैलीत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत.

या मालिकेत किशोरी आंबिये' यांचे दोन ट्रॅक असून त्यांच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेत काय वळण येणार? हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन काळातल्या व्यक्तिरेखा त्या यात साकारत असून प्राध्यापिकेच्या भूमिकेनंतर नव्या ट्रॅकमध्ये त्या कोणत्या रूपात दिसणार? आणि त्यांच्या येण्याने अभिमन्यू आणि तन्वीच्या आयुष्यात काय होणार ? की त्यांच्या येण्याने या दोघांचे बंध जुळले जाणार? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे.

चांगल्या विषयामुळे आणि भूमिकेमुळे मी या मालिकेला होकार दिला. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारी ही मालिका आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका करताना खूप मजा येत असल्याचे किशोरी आंबिये' सांगतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा