मनोरंजन

Lara Dutta : अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण, मुंबई महापालिकेनं घर केलं सील

Published by : Team Lokshahi

कोरोना( Covid 19) विषाणूच्या लाटेचा प्रभाव भारतामध्ये कमी झाला आहे. पण अजूनही भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात जगभरात विविध देशांमध्ये चौथ्या लाटेनं धडक दिल्याचं बोललं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी, आता बॉलिवूडमधून कोरोना विषाणूचे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) हिला कोरोनाची लागण झाली आहे.

मात्र नुकतंच अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) कोरोनाची लागण झाली. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) तिचं घर सील केलं असून तिच्या घराचा परिसर हा 'मायक्रो कंटेन्मेंट झोन' ( Micro-Containment Zone) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सुदैवाने लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. दरम्यान, लारा दत्ताकडून अद्याप कोणतीही माहिती याबाबत देण्यात आलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

National Film Awards : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर! 'या' मराठी सिनेमाने पटकावला पुरस्कार, विजेत्यांची यादी जाणून घ्या

Latest Marathi News Update live : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Manikrao Kokate : खातेबदलानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जो निर्णय झाला, तो..."

Daund Yavat News : दौंडच्या यवतमध्ये वादग्रस्त पोस्टवरून दोन गटात तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त