Madhuri Pawar Team Lokshahi
मनोरंजन

सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री माधुरी पवारच्या टक्कलची चर्चा 

अभिनेत्री माधुरी पवारला का करावी लागली शिव्यांचीही प्रॅक्टिस 

Published by : shamal ghanekar

'रानबाजार'ने भागावली अभिनेत्री माधुरी पवारची '....भूक'   

प्रत्येक अभिनेत्रीला ग्लॅमरस किंवा बोल्ड कॅरॅक्टर एकदा तरी करायच असतं. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका वठवण्याची हिम्मत मोजक्याच अभिनेत्री करतात. हे मोठे शिवधनुष्य अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने लीलया पेलले आहे. तिच्या पहिल्याच 'रानबाजार' (RaanBaazar) या वेबसिरीज मधून याची प्रचिती येते. कोणत्याही 'स्टीरिओ टाईप'मध्ये न अडकता तिने तिच्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवल आहे.

राजकारणातील एक महत्वकांशी आणि करारी स्त्री ची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार हीने यामध्ये चोख बजावली आहे. अलीकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लुक बद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमीका साकारणे हे खरंच वाखाण्याजोगे आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'रानबाजार' या वेबसिरीजमध्ये प्रेरणा सायाजीराव पाटील साने ही राजकीय स्त्री व्यक्तीरेखा माधुरीने उत्तम निभावली आहे. वडीलांच्या निधनानंतर राजकीय वारसासाठी तिने केलेली खेळी. जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनंतर तिने स्वतःचे केलेले मुंडन अन् त्याच बाल्ड लुकमध्ये तिने पुढे सुरू ठेवलेला राजकीय प्रवास हा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढविणारा आहे. हनी ट्रॅप, राजकारण आणि त्यामध्ये प्रेरणाचं पुढचं पाऊल काय असेल? याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आता निर्माण झाली आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना माधुरी पवार म्हणते, अशी भूमिका मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षित होत. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. राजकारणातील  स्त्रीयांच्या वरील पुस्तक वाचली. इतकेच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी अक्षरशः शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस केली. यामुळेच ही भूमिका आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेरणा सायाजीराव पाटील साने या भूमिकेमुळे माझी अभिनयाच्या भूक भागली आहे, असे म्हटंले तर वावगे ठरणार नाही.

Talent has born - अक्षय बर्दापूरकर

माधुरीबद्दल बोलताना प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणाले,  ''Talent has born' माधुरीच्या रूपाने मराठी फिल्म इंडस्ट्रीत नवीन टॅलेंट जन्माला आलेले आहे. यामध्ये तिने वठवलेली भूमिका रियलिस्टिक वाटते. तिच्यासाठी एकदा तरी 'रानबाजार' ही वेबसिरीज पाहिलीच पाहिजे'.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा