मनोरंजन

अभिनेत्री महिमा चौधरी यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटातील फर्स्ट लूक आउट

कंगना रणौतचा चित्रपट इमर्जन्सीचा फर्स्ट लूक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर या लूकचे खूप कौतुक होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कंगना रणौतचा चित्रपट इमर्जन्सीचा फर्स्ट लूक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर या लूकचे खूप कौतुक होत आहे. आता या चित्रपटातील महिमा चौधरी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.महिमा चौधरी या चित्रपाटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. पुपुल जयकर या संस्कृतिक कार्यकर्त्या, लेखिका होत्या. भारत सरकारकडून त्यांना पद्म भूषण या पुरस्करानेही गौरविण्यात आले होते.

हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार असून चित्रपट हा राजकीय नाटक आहे. यामध्ये कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. चित्रपटात इमर्जन्सीचा (Emergency) काळ दाखवण्यात आला आहे. 'धाकड' चित्रपट फ्लॉप होताच कंगनाने या चित्रपटाची तयारी सुरू केली.

कंगनाने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल अनेकदा लिखाण केले आहे. तिने लिहिले की, मी एक वर्षापासून यावर काम करत आहे. आता असे वाटते की या चित्रपटासाठी माझ्यापेक्षा चांगला दिग्दर्शक कोणीच असू शकत नाही. कंगना राणौत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मणिकर्णिका नंतर तिच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा दुसरा चित्रपट आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड