मनोरंजन

Subhedar Movie: 'सुभेदार'मधला अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा लूक आला समोर

एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे.

Published by : Team Lokshahi

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन सुभेदार चित्रपटात होणार आहे.

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटातील बऱ्याच कलाकारांचे लूक समोर आले आहेत. दरम्यान आता या चित्रपटात केसरची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा लूक समोर आला आहे. तिला या लूकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे.

मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर सुभेदार चित्रपटातील लूक शेअर करत लिहिले की, हात बांधून लई मर्द बनतुया? ह.. हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दावते.. मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया. मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोत तिच्या डोक्यावर पदर, कपाळावर मोठं कुंकू, नाकात नथ आणि गळ्यात कवड्याची माळ पाहायला मिळत आहे. खरेतर तिला या लूकमध्ये ओळखणंदेखील कठीण झाले आहे. मृण्मयीच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. सुभेदार चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...