Priyanka Chopra & Nick Jonas Team Lokshahi
मनोरंजन

प्रियांका चोप्रानं केलं मुलीचं नामकरण; कॉम्बिनेशन पाहून चक्रावेल डोकं

प्रियांका चोप्रा जोनस आणि निक जोनस यांच्या मुलीचं नाव अखेर समोर आलं आहे. 

Published by : Rajshree Shilare

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केले की त्यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. त्यावेळी या दोघांनीही त्यांना मुलगा आहे की मुलगी याची कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु नंतर हे उघड झाले की दोघेही एका मुलीचे पालक बनले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. TMZ ने याविषयी वृत्त दिले आहे. प्रियांका आणि निकच्या मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्या प्रमाणपत्रात नाव नमूद केले आहे.

मालतीचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथे 15 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यानंतर झाला होता, असे असले तरी अद्याप प्रियांकाने आपल्या मुलीच्या नावाची माहिती दिली नाही. या मुलीच्या नावाचा एक विशेष अर्थ असू शकतो. कारण प्रियांकाच्या मुलीच्या नावात भारतीय आणि पाश्चिमात्य झलक दिसून आली आहे.प्रियांका चोप्राला आपल्या मुलीचे नाव काहीतरी अर्थपूर्ण आणि वेगळे असावे अशी तिची इच्छा होती.

मालती मेरी नाव संस्कृतमधून आले आहे. याचा अर्थ- 'छोटे सुगंधित फूल.' त्याच वेळी, मेरी लॅटिन भाषेतील स्टेला मॅरिस या शब्दापासून बनलेली आहे, ज्याचा अर्थ समुद्रातील तारा आहे. याबरोबरच मेरी हे येशूच्या आईचे नाव होते.

प्रियांका आणि निक जोनास यांनी 22 जानेवारी 2022 रोजी इंस्टाग्रामवर घोषणा करून पालक बनल्याची माहिती दिली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा