Admin
मनोरंजन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. सोनालीने आतापर्यँत विविध भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. हिरकणीनंतर आता पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. सोनालीने आतापर्यँत विविध भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. हिरकणीनंतर आता पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.

सोनालीच्या आगामी चित्रपटाचं नाव 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' असं असून नुकताच चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.हा चित्रपट प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे. प्लॅनेट मराठीने पोस्टर शेअर करत 'औरंगजेब सारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या बलाढ्य मोगल दिल्लीपती पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा झोपवणा-या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!'असं कॅप्शन दिलं आहे.

चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे. 'प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि 'मंत्रा व्हिजन' निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या "मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई" या ग्रंथावर आधारीत आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा