Charu Asopa Rajeev Sen Divorce Team Lokshahi
मनोरंजन

Charu Asopa Rajeev Sen Divorce : राजीव आणि चारू होणार विभक्त; कायदेशीररित्या घेणार घटस्फोट

राजीव-चारु हे लवकरच होणार विभक्त

Published by : shamal ghanekar

राजीव सेन (Rajeev Sen) म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ याच २०१९मध्ये अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) हिच्याबरोबर लग्न झाले होते. हे लग्न अगदी थाटामाटात पार पडले होते. पण आता राजीव-चारु हे लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चा होत आहे.

चारू आणि राजीव या जोडप्याने आता कायदेशीर मार्गाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्यामध्ये लग्नापासूनच अडचणी सुरू होत्या. या दोघांमधील असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न यांचे कटुंबीय करत होते. परंतु त्यांचे प्रयत्नही अपयशी ठरत आहेत.

अभिनेत्री चारुला आपण छोट्यापडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘मेरे अंगने में’ या हिंदी मालिकांमध्ये पाहिले आहे. या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत. त्यानंतर चारूने राजीवशी लग्नबंधनात अडकली आणि दोघांनीही नवीन आयुष्याला सुरुवात केली. पण आता राजीव-चारु हे लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण घेतले आहे. या दोघांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण दोघं लवकरच विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. दोघेही कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असावा असेही बोलले जात आहे. हा निर्णय ऐकून सेन कुटुंबियांना मोठा धक्का बसला असेही बोलले जात आहे.

चारु-राजीवला सात महिन्यांची क्युट मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव झियाना (Jhiana) आहे. चारूने इन्स्टाग्रमावरून तिच्या पतीचे म्हणजेच राजीवबरोबरचे सर्व फोटो देखील डिलीट केले आहेत. आणि चारू इन्स्टाग्रमावर राजीवला फॉलोही करत नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा