मनोरंजन

अभिनेत्री स्वरा भास्करला टॅक्सी ड्रायव्हरने लुटले

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री स्वरा भास्करच्या (Swara Bhaskar) वस्तू लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) चोरीला गेले आहे. तिने ही बातमी ट्विटरवर (Twitter) ट्विट करत कॅबच्या (Cab) विरुध्दात तक्रार केली आहे. स्वरा भास्करने लॉस एंजेलिसमध्ये किराणा सामान (Groceries) खरेदी केले होते जे उबेर चालक (Uber driver) घेऊन पळून गेला. सोशल मीडियावर (social media) युजर्स स्वरा भास्करची खिल्ली उडवत आहेत तसेच हे त्यांच्या कर्माचे फळ असल्याचे सांगत आहेत.

स्वरानं तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग ट्वीट (Tweet) करत सांगितल की, तुमचा ड्रायव्हर (Driver) माझ सर्व किराणा सामानासह कारमधून पळून गेला. तुम्हच्या ऍपवर तक्रार करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. ही हरवलेली वस्तू नाही त्याने माझे सामान चोरले आहे. मला माझे सामान परत मिळेल का असा प्रश्न स्वराने केला आहे.

स्वराच्या या ट्वीटवर उबर कंपनीने उत्तर दिले आहे "तुमच्यासोबत जे घडलं यासाठी आम्ही दिलगीर व्यक्त करतो. पण निश्चितच आमच्या कंपनीच्या इतिहासात असं घडलेलं नाही. आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेत आहोत,आणि लवकरच आमच्याकडून ह्या तक्रारीची चौकशी होईल आणि तुम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा