मनोरंजन

‘अधांतरी’लवकरचं येणार भेटीला

Published by : Lokshahi News

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर,आणि डॉली गर्ल पर्ण पेठे हे दोघे लवकरचं एका वेबसिरीजच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत.अधांतरी या वेबसिरीजच्या माध्यामतून प्रेक्षकांना दोघे स्क्रीन शेअर करताना दिसतील.या वेबसिरीजमध्ये लोकप्रिय अभिनेते विराजस कुलकर्णी,आरोह कुलकर्णी आणि त्याच्याबरोबर आशय कुलकर्णी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

अधांतरी वेबसिरीज ही काहीशी प्रेमळ आणि रोमँटिक कॉमेडी अशी आहे.सध्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ट्रेंडिंगला आहे.त्याच विषयाला घेऊन 'अधांतरी' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'अंधातरी' शोमधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला,"मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आलाय असाच काळ यात आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत".

पर्ण पेठे शो विषयी म्हणाली, "परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवावा लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा