Urmila Kothare, Adinath Kothare Team Lokshahi
मनोरंजन

उर्मिला, आदिनाथची ‘लव्ह स्टोरी’ ची सुरुवात झाली अशी...

उर्मिलाच्या करिअर आणि लव्हस्टोरीचा श्री गणेशा कोठारेंच्या घरीच झाला.

Published by : shweta walge

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) खुप प्रसिद्ध आहे. उर्मिलाचे असंख्य चाहते आहेत. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. उर्मिला आणि आदिनाथ (Adinath Kothare) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. 

उर्मिला कोठारेने सिनेइंडस्ट्रीतील करिअरला नुकतीच सुरुवात केली होती. नायिका म्हणून तिचा एकही चित्रपट आला नव्हता. त्याच दरम्यान महेश कोठारे (Mahesh Kothare) 'शुभमंगल सावधान' हा चित्रपट करत होते. त्यांना या चित्रपटासाठी एखादी नवीन नायिका हवी होती. या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी महेश यांनी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावले होते. उर्मिला त्यांच्या घरी गेली. तेव्हा तिथे आदिनाथ देखील होता. तो नुकताच झोपेतून उठला होता. त्याने उर्मिलाकडे पाहिले आणि तो पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. उर्मिलाच्या करिअर आणि लव्हस्टोरीचा श्री गणेशा कोठारेंच्या घरीच झाला.

उर्मिलाचा ​'शुभमंगल सावधान' हा नायिका म्हणून पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात आदिनाथने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. चित्रपटाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिला यांची सतत भेट व्हायची. त्यातून त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथने उर्मिलाला मुंबईत प्रपोज केले. दोघांनी बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी दोघे लग्नबेडीत अडकले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर…

Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला

Nashik : रक्षाबंधन ठरलं अखेरचं! बिबट्याने केली भावाबहीणीच्या नात्याची ताटातूट

Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी