मनोरंजन

पहिल्याच दिवशी आदिपुरुष मोडणार सर्व रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर कमवणार 'इतके' कोटी

बाहुबली चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 121 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर कोणत्याही चित्रपटाला हा विक्रम मोडता आला नाही. आता मात्र, ‘आदिपुरुष’ चित्रपट हा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Adipurush Box Office : सुपरस्टार प्रभासने 2017 मध्ये त्याचा बाहुबली चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 121 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर प्रभासच्याही कोणत्याही चित्रपटाला हा विक्रम मोडता आला नाही. त्याचे साहो आणि राधे-श्याम सारखे चित्रपट थिएटरमध्ये आले. पण हा विक्रम अजून कोणीही मोडला नाही. मात्र, आता प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपट हा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रभासचा आदिपुरुष पहिल्या दिवशी बाहुबली 2 पेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन आणि सनी सिंग यांचा आगामी चित्रपट आदिपुरुषची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळे आदिपुरुष पहिल्याच दिवशी बाहुबली 2 पेक्षा जास्त व्यवसाय करेल आणि सर्व रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आदिपुरुष चित्रपटाची प्रीबुकिंग पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी जगभरात 130 कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी होईल. तेलगू चित्रपटसृष्टीत प्रभासची खूप क्रेझ आहे आणि ती आता हिंदी प्रेक्षकांमध्येही दिसू लागली आहे. परदेशातही या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. अशा परिस्थितीत बाहुबली 2 ची कमाई पहिल्याच दिवशी सहज पार करू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा