मनोरंजन

आदित्य नारायण झाला बाबा, श्वेता अग्रवालने दिला एका मुलीला जन्म

Published by : Team Lokshahi

सिंगर आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) आता आई बाबा झाले आहेत. 24 फेब्रुवारीला मुबंई मधल्या एका हाॅस्पीटलमध्ये श्वेताने एका मुलीला जन्म दिला आहे. बाप झाल्या नंतर आदित्य नारायण बोलला की, "मी खुप आनंदी आहे मला आशा होती की मी एका मुलीचा बाप होईन."

आदित्यने एका मुलाखातीत सांगितले, प्रत्येकजण मला म्हणत होता की, 'मला मुलगा होईल' पण कुठेतरी मला आशा होती की मी एका मुलीचा बाप होईन. मुलगी नेहमी बापाच्या खुप जवळ असते आणि मी खुप खुश आहे की मला लिटिल ऐंजेल (Little Angel) झाली आहे. आम्ही खुप नशीबवान आहोत की आम्ही पालक (Parents) झालो आहे. श्वेता साठी माझं प्रेम आणि आदर अजून वाढला आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते आणि जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा तिला बर्‍याच गोष्टींचा सामना करावा लागतो.

मी बाळासाठी आधीच गाणी गात आहे, संगीत त्याच्या डीएनएमध्ये (DNA) आहे. माझ्या बहिणीने त्याला एक छोटा संगीत वादक भेट दिला आहे. वादकामध्ये मंत्र आणि नर्सरी यमक सतत वाजत आहेत. या कुटूंबात संगीत असल्यामुळे तिचा सांगीतिक प्रवास सुरू झाला आहे. हे तिच्यावर अवलंबून आहे की तिला मोठं होउन काय व्हायचं आहे. तिला बघण्यासाठी माझे आजी आजोबा खुप उत्साहीत आहेत. मी खुप खुश आहे की माझ्या कुटुंबात खुप स्त्रिया आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा