Aditya Singh Rajput Death Team Lokshahi
मनोरंजन

Aditya Singh Rajput Death: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू; घराच्या बाथरुममध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) दुपारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला.

Published by : shweta walge

प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) दुपारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.

आदित्य अंधेरीतील एका इमारतीत ११व्या मजल्यावर राहत होता. काही मित्रांना घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला. आदित्यच्या मित्रांनी वॉचमॅनच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

आदित्य सिंह राजपूतने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. आदित्यच्या मृत्यूनं मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. 'स्प्लिट्सविला' या शोमध्ये आदित्य सिंह राजपूतने काम केले होते. तसेच त्यानं काही जाहिरातींमध्ये देखील काम केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा