मनोरंजन

Rajinikanth Coolie Movie : राजीनिकांतच्या ‘कुली’ चित्रपटाने रिलीजपूर्वीच केले 50 कोटींपार! थग लाइफसह इमर्जन्सीच्या कमाईलाही टाकलं मागे

राजीनिकांतचा कुली हा चित्रपट रिलीजच्या आधीच बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगला भारतात शुक्रवारी सुरुवात झाली.

Published by : Team Lokshahi

राजीनिकांतने भूमिका साकारलेल्या कुली हा लोकेश कनगराज दिग्दर्शित चित्रपट रिलीजच्या आधीच बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगला भारतात शुक्रवारी सुरुवात झाली. फक्त चार दिवस बाकी असतानाच या चित्रपटाने जगभरात 50 कोटींपेक्षा जास्त ॲडव्हान्स बुकिंगचा टप्पा गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील प्री-सेल्सचा मुख्य लाट अजून यायचा असल्याने हा आकडा रिलीजपूर्वी सहज दुप्पट होऊ शकतो.

कुलीमध्ये राजीनिकांतसोबत नागार्जुन, उपेंद्र आणि श्रुती हासन प्रमुख भूमिकेत आहेत, तर आमिर खान विशेष भूमिकेत झळकणार आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार शनिवारीपर्यंत परदेशात 4 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 33.6 कोटी) बुकिंग झाले होते, तर रविवारी हा आकडा 5 दशलक्ष (सुमारे 42 कोटी) पार गेला.

भारतामध्ये ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दोन दिवसांत 14 कोटींची विक्री झाली आहे. यातील 10 कोटी केवळ पहिल्या दिवसासाठीचे आहेत. तमिळ आवृत्तीने सर्वाधिक 9.98 कोटींची विक्री केली असून, तेलुगू आणि कन्नड आवृत्तींनाही चांगली सुरुवात मिळाली आहे. हिंदी डब मात्र सध्या मंद आहे; 400 शोमधून फक्त 2500 तिकीट विकली गेली आहेत. तरीही, चित्रपट जेलरच्या 18 कोटींच्या विक्रमाला मागे टाकणार असून, लक्ष्य आहे लिओचा 46 कोटींचा सर्वकालीन भारतीय ॲडव्हान्स बुकिंग विक्रम.

रिलीजपूर्वीच कुलीने भारतात मिळवलेल्या 14 कोटींमुळे इमर्जन्सीसारख्या हिंदी चित्रपटाच्या एकूण कमाईला मागे टाकलं आहे. परदेशी बाजारपेठेत मिळवलेले 41 कोटी हे कमल हासनच्या थग लाइफच्या परदेशातील एकूण कमाईपेक्षा जास्त आहेत. देशांतर्गत आकडेवारीत अद्याप थोडी तूट असली तरी 14 ऑगस्टच्या रिलीजपूर्वी ती भरून निघण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, कुली भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक ठरू शकतो आणि राजीनिकांत यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च ओपनिंगचा मान पटकावू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा