मनोरंजन

तब्बल सहा वर्षांनी तो पुन्हा दिसणार 'स्टार प्रवाह'वर, 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतून करणार दमदार एन्ट्री

स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं'या नव्या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या मालिकेत एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एक नवा पाहूणा एन्ट्री करताना दिसणार आहे.

Published by : Team Lokshahi

स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं'या नव्या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत चालेली आहे. यामध्ये अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. नुकताच या मालिकेत एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एक नवा पाहूणा एन्ट्री करताना दिसणार आहे. हा अभिनेता या आधी ही स्टार प्रवाह आपली हटके भूमिका गाजवून गेला आहे आणि आता तो तब्बल सहा वर्षांनी पून्हा एका नव्या अंदाजासह 'स्टार प्रवाह'वरील 'येड लागलं प्रेमाचं'या मालिकेतून भेटीला येणार आहे.

येड लागलं प्रेमाचं या मालिकेत पुनरागमन करण्याआधी हा अभिनेता 'देवयानी' या लोकप्रिय मालिकेत काम करून झाला आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकरणारा संग्राम साळवी हा आता येड लागलं प्रेमाचं या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेत इन्स्पेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत संग्राम साळवी दिसणार आहे. प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे संग्रामच्या एन्ट्रीची, यामध्ये संग्राम जरा हटके आणि डॅशिंग स्टइलमध्ये दिसणार आहे. या आधी संग्राम शिवानी सुर्वे देवयानी या मालिकेत दिसला. या दोघांच्या जोडी सोबतच या मालिकेतील संग्रामचे काही डायलॉग ही तितकेच लोकप्रिय झाले, जे आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहेत.

स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं'या मालिकेतील धमाकेदार एन्ट्रीवर संग्राम म्हणाला येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मी साकारत असलेलं पात्र जा हटके आहे. इन्स्पेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत खलनायक साकारतोय. खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो. भूमिकेतले बारकावे हळूहळू आत्मसात करतोय. पुढे तो म्हणाला, ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. तरी मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद अन् प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन.”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?