बिग बॉस फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या अनोख्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.राखी सावंतचे अनेक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात राखी सावंतने एलोन मस्क तिचा भाऊ असल्याचा मोठा दावा केला आहे. याआधी देखील तिने डोनाल्ड ट्रम्प यांना आपले खरे वडील असल्याचे सांगितलं होत.
राखी सावंत म्हणाली की, "आज मी लोकांना सांगू इच्छिते की, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. माझ्या आईने सांगितलं आहे की, एलोन मस्क माझा भाऊ आहे. तीन वर्षानंतर मी घर उघडलं आणि घरात जाऊन बघितलं तर चिठ्ठी पडलेली आहे. मी याबाबतीत ट्वीटरला तुम्हा सगळ्यांना माहिती देईनचं..." हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राखी सावंत या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.
डोनाल्ड ट्रम्पवरुन केलेलं राखी सावंत यांच वक्तव्य काय?
या वेळी राखी सावंत एका इव्हेंटमध्ये ब्लॅक रंगाच्या कपड्यात दिसत होती. मीडिया प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले, माझी आई आता या जगात नाही. माझ्या आईने एक चिठ्ठी सोडली होती, ज्यात लिहून ठेवलं होतं की, माझे खरे वडील डोनाल्ड ट्रम्प आहेत. राखीला त्यावेळी एका प्रश्न विचारण्यात आला की, पण सध्या ट्रम्प मोदींना खूप त्रास देत आहेत. या प्रश्नावर राखी सावंत पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणाली, 'थैंक यू सो मच, माझ्याशी पंगा घेऊ नका.'
अभिनेत्री राखी सावंत आणि पती आदिल दुर्राणी यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. दोघांनी एकमेकांविरोधात केलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहेत. परस्परांविरोधातील गुन्हे रद्द करण्यास दोघांनी अनुमती दर्शविल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हे रद्द केले. मंगळवारी दोघांनी उच्च न्यायालयात हजर राहत परस्परांविरोधातील गुन्हे रद्द करण्यास अनुमती दर्शवली होती. दुर्रानी विरोधात राखी सावंतने ओशिवरा पोलीस ठाण्यात तर दुर्रानीने राखी विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.