Uddhav Thackeray, Gauhar Khan Team Lokshahi
मनोरंजन

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर,मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक करत गौहर खान म्हणाली…

सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : shweta walge

राज्यात सध्या मोठी राजकीय उलथपालथ सुरु आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडला. उद्धव यांनी वर्षा बंगला सोडताना त्यांना निरोप देण्यासाठी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. तर ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’मधील मार्गावर उद्धव यांच्या स्वागतासाठीही ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हे सगळं पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्यात अभिनेत्री गौहर खानने (Gauhar Khan) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं कौतुक केले आहे.

गौहरने तिच्या सोशल अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. एकता, सहिष्णुता, सर्वसमावेशकता, राज्याची प्रगती याचं उत्तम उदाहरण मांडणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, असं गौहर मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात पोस्ट करुन पाठिंबा व विरोध दर्शवत आहेत. अशातच गौहरने हे ट्विट व्हायरल होत आहे.

तर गुवाहाटीतील बंडखोर आमदारांची आज बैठक होणार असून पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा