मनोरंजन

Farhan Shibani Wedding | फरहान अख्तरच्या लग्नानंतर पहिली पत्नी अधुना होतेय ट्रोल

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची ( Farhan Akhtar) पहिली पत्नी लंडनमधील (London)  सेलिब्रेटी हेअरस्टायलिस्ट (Celebrity Hairstylist) असू्न ती फरहानपेक्षा वयाने 6 वर्षांनी मोठी आहे. आणि ती 'बी ब्लंट' ('BeBlunt') नावाची सलून फ्रांचाइजी चालवते. फरहान आणि अधुना ३ वर्षं डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा करण्याचा निर्णय घेतला. तसेच यांना शाक्या (Shakya) आणि अकीरा ( Akira) नावाच्या दोन मुली देखील आहेत. 2017 मध्ये दोघेही कायदेशीर पद्धतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हे (19 फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकले आहे. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असताना, दुसरीकडे फरहानची पहिली पत्नी अधुना भाबानीला (Adhuna Bhabanila) हिला ट्रोल केले जाते.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नानंतर अधुनाला ट्रोल केले जात होते. यामुळे संतापलेल्या अधुनाने एक पोस्ट शेअर केली. यामधून तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले असून अधुनाने तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटनरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधून अधुनाने अप्रत्यक्षरित्या तिने नेटकऱ्यांना सल्लाचं दिला. "ज्या युजरकडे सकारात्मक बोलण्यासारखे काहीही नाही ना तर मी त्यांना थेट ब्लॉक (Block) करणार आहे". अधुनाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा