Shahrukh Khan Team Lokshahi
मनोरंजन

'पठाण' हा सिनेमा एवढा मोठा सुपरहिट ठरला यावर विश्वास बसलेला नाही- शाहरुख खान

पठानची घोडदोड सुरू असतानाच शाहरूख खान माध्यमांसमोर

Published by : Sagar Pradhan

सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांचा पठाण चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. आधी वादात सापडलेला हा चित्रपट आता चांगली कमाई करताना दिसत आहे. त्यातच हे यश मिळत असताना आता शाहरुख खान आज माध्यमांसमोर आला आहे. यावेळी त्यानी 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, सिद्धार्थ आनंदचे आभार मानले. सोबतच काही विषयावर देखील भाष्य केले.

नेमकं काय म्हणाला शाहरुख खान?

शाहरुख खान मागील चार वर्ष ब्रेकवर होता. त्यावर बोलताना तो म्हणाला की, माझा 'पठाण' आधीचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे प्लॅन बीच्या दृष्टीने विचार करत मी जेवण बनवायला शिकलो. मी इटालियन जेवण बनवायला शिकलो. लोक म्हणाले की, आता माझे सिनेमे चालणार नाहीत, म्हणून मी रेस्टॉरंट उघडण्याचा विचार केला. लोकांना आनंद वाटण्याचा प्रयत्न केला. आता 'पठाण' सिनेमाच्या यशामुळे मी मागचे चार वर्ष विसरलो आहे. असे तो म्हणाल्या.

पुढे बोलताना तो म्हणाला की, मी लोकांपर्यंत आनंद पसरवू शकेन ही मनापासून इच्छा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मला आनंद शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आदित्य आणि सिद्धार्थ आनंद यांचा मी कायम ऋणी राहीन ज्यांनी मला काम करण्याची संधी दिली. मी जॉन, दीपिका, आदित्य, सर्वांचे आभार मानतो. 'पठाण' हा सिनेमा एवढा मोठा सुपरहिट ठरला आहे यावर आम्हाला अजूनही विश्वास बसलेला नाही. असा देखील तो यावेळी म्हणाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा