मनोरंजन

रणवीर सिंहनंतर 'या' टीव्ही अभिनेत्याने केला न्यूड फोटो शेअर

Ranveer Singh Nude Photoshoot त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. यात टीव्ही अभिनेत्यानेही उडी मारली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या यूनिक स्टाइलसाठी (Unique style) ओळखला जातो. रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे. पण, रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) अनेकांना आवडले नाही. आता हे फोटोशूट त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. आता रणवीर सिंगविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशातच यात टीव्ही अभिनेता नकुल मेहता यानेही उडी मारली. त्याने एक न्यूड फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

नकुल मेहताने रणवीर सिंगच्या एका न्यूड फोटो मॉर्फ करत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने एक कॅप्शन दिले आहे. आता हेटर्स म्हणतील मी रणवीर सिंहकडून उधारीवर घेतले आहे. स्टोन एडिटर इन चीफ, असे कॅप्शन त्यांने फोटोला दिले आहे. नकुलाचे हे रिक्रीएटेड फोटो बघून चाहते आश्चर्यचकीत झाले आहे. तर, नकुलच्या पत्नीने तातडीने कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकांना नकुलचा हा प्रयोग आवडला आहे. करणवीर बोहराने त्याच्या फोटोवर कमेंट करत तुला असे फोटोशूट करायला हवे, असा सल्ला दिला आहे.

दरम्यान, नकुल मेहता सध्या बडे अच्छे लगते है या सिरिअलमध्ये राम कपूरची मुख्य भूमिका निभावत आहेत. याआधीही त्याने प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर इश्कबाजमधून नकुलला विशेष प्रशंसा मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."