मनोरंजन

घटस्फोटानंतर समांथाने विकत घेतलं पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यचं घर

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाने ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तीच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. आता ती एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाने ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तीच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. आता ती एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे ते म्हणजे समांथा विकत घेतलेल्या नव्या घरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये नुकतंच एक आलिशान घर खरेदी केलं आहे. हे घर तिच्यासाठी खास आहे कारण हे घर समांथाच्या पूर्वी तिचा पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यसोबत याच घरात राहत होती. याशिवाय लवकरच ती बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार असल्याचं बोललं जातंय.

समांथाने ‘पुष्पा’ चित्रपटात ‘ऊं अंटवा’ हे सुपरहिट आयटम साँग दिलं होतं. ज्याची बरीच चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच तिने अक्षय कुमारसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली आहे. अभिनय हा तिच्या करिअर नियोजनाचा भाग नव्हता. तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. असे तिने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर