थोडक्यात
अभिनेत्री ऐश्वर्या रायची कोर्टात धाव
परवानगीशिवाय जाहिरातीत फोटो वापरल्याचा आरोप
ऐश्वर्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
(Aishwarya Rai) बॉलिवूड कलाकार ऐश्वर्या राय बच्चन यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्लीत उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. ऐश्वर्याने ‘पर्सनॅलिटी राईट्स’च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली. परवानगीशिवाय फोटो वापरून व्यावसायिक जाहिराती करणाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
ऐश्वर्याच्या नावाचा आणि फोटोंचा व्यावसायिक वापर परवानगीशिवाय केला जात असल्याची माहिती मिळत असून एका वेबसाइटने कोणतीही परवानगी न घेता आपले फोटो आणि एआय-जनरेटेड फोटो वापरून त्यांचे प्रॉडक्ट्स विकले, ज्यामुळे माझी प्रतिमा खराब होत आहे, असा आरोप ऐश्वर्या रायने केला आहे. काही अनधिकृत वेबसाइट्स तिच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय गैरवापर करत आहेत, हे लक्षात आल्यामुळे तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
लोकांना माझे नाव, प्रतिमा, एआय जनरेटेड पॉर्नोग्राफिक कंटेंट वापरण्यापासून रोखावे, अशी विनंती तिने याचिकेतून केली आहे.ऐश्वर्या रायच्या वकिलांनी न्यायालयाला त्या वेबसाइट्स आणि कंटेंटबद्दल माहिती दिली आहे.