अजय देवगण (ajay devgan)पोलिसाच्या भूमिकेतील चित्रपटात भूमिका साकारताना दिसतो. आगामी 'भोला' चित्रपटातही सिंघम पुन्हा पोलिसांची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूडचा (bollywood)'सिंघम' अजय देवगन हा त्याच्या खास शैलीसाठी ओळखला जातो. सिंघम सिनेमातील पोलिसाच्या भूमिकेनंतर 'बॉलिवूडचा सिंघम' अशी अजयची ओळख बनली आहे.
अजयने नुकतीच त्याच्या 'भोला' या सिनेमाची घोषणा केली. या नव्या सिनेमातही अजय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साऊथच्या 'कॅथी' या एक्शन थ्रिलर सिनेमाचा हा रिमेक आहे. 'भोला' या सिनेमातह अजय दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा अजयसोबत मुख्य भूमिकेत आहे.
अजय देवगन आणि तब्बू ही जोडी यापूर्वीही अनेक सिनेमात एकत्र दिसली आहे. आता 'भोला'च्या निमित्तानं ते पुन्हा एकदा सोबत काम करणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून 'भोला' हा सिनेमा 30 मार्च 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.