तापसीचे शाहरुख सोबत काम करण्याचे स्वप्न झाले साकार
राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटात तापसी पन्नू शाहरुख खान (Tapsee Pannu) सोबत काम करणार आहे. त्यांनी आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
शाहरुखसोबत पहिल्यांदाच चित्रपटात काम मिळाले असल्याने तापसी खूप खूश आहे. ट्विटरवर आनंद व्यक्त करताना अभिनेत्री तापसीने म्हणाली, होय, इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता आणि जेव्हा तुम्ही स्वतः सर्वकाही करता तेव्हा ते अधिक कठीण होते.
अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है'. प्रामाणिकपणा, कठीण परिश्रम आणि संयमाचे हे फळ आहे. जवळपास 10 वर्षे लागले पण शेवटी ‘ऑल इज वेल’, असे ट्विट तापसीने केले आहे.
तापसीने ट्विटमध्ये ज्या डायलॉगबद्दल बोललेली आहे तो शाहरुख खानने ओम शांती ओम या चित्रपटात बोलला असून ऑल इज वेल हा डायलॉग राजकुमार हिरानीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 3 इडियट्सचा आहे. तापसीच्या या ट्विटनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिचे अभिनंदन देखील केले आहे.