मनोरंजन

“भुज- द प्राईड ऑफ इंडिया” चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'भुज- द प्राईड ऑफ इंडिया' या बहुचर्चित चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्याचवेळी या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती.

'भुज-द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात भारतीय हवाई दलातील शूर अधिकारी विजय कर्णिक यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपटात भारत-पाक युद्धातल्या सत्य घटनांवर आधारित आहे. पाकिस्तानने भूजवर हल्ला केला होता. त्यावेळी विजय कर्णिक हे भुजच्या हवाई तळाचे प्रमुख होते.

सगळ्यात जास्त चर्चा ही अजयच्या एका डायलॉगची होतं आहे. "हम उस महान छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने मुगलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था" हा डायलॉग प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणार हे नक्कीच.

स्वातंत्र्यदिनापुर्वी म्हणजेच हा चित्रपट १३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण सोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आता भाषेनंतर जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक