Ajay devgan
Ajay devgan Team Lokshahi
मनोरंजन

Ajay Devgan : तब्बू अन अजयची जोडी पुन्हा झळकणार....

Published by : prashantpawar1

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) शेवटचा रनवे 34 या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग (Rakul Prit Singh) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. यानंतर अजय 'भोला' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. भोला हा तामिळ चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. भोलामधील अजय देवगण 'कैथी' या चित्रपटात अभिनेता कार्तीने साकारलेली भूमिका साकारणार आहे. भोला देखील खास आहे कारण दिग्दर्शक म्हणून अजय देवगणचा हा चौथा चित्रपट असेल ज्याचं दिग्दर्शन तो स्वतः करणार आहे. तसेच अजय आणि तब्बूची जोडीही या चित्रपटात पडद्यावर पहायला मिळणार आहे.

अजयने आपल्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक फोटो शेअर करताना भोलाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. फोटोमध्ये अजयने कॅमेरा घेतलेलं दिसत आहे.

अजयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, सध्या काम करण्याची वेळ आली आहे. 'भोला' हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी बॉक्सऑफिसवर (Box office) प्रदर्शित होणार आहे. भोला हा एक इमोशनल ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये अजय देवगण आणि तब्बूची जोडी दिसणार आहे. 90 च्या दशकापासून अजय आणि तब्बूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. पडद्यावरची दोघांची जोडी खूपच हिट मानली जाते. अजय आणि तब्बू शेवटचे 'दे दे प्यार दे' या चित्रपटात दिसले होते. भोलाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटात तब्बू एका दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. भोलाची निर्मिती अजय देवगण टी-सीरीज फिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि ड्रीम वॉरियर पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करणार आहे. भोलाचा मुहूर्त 11 जानेवारी 2022 रोजी झाला. भोला हा तामिळ चित्रपट कैथीचा रिमेक असला तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार भोलाच्या हिंदी रिमेकमध्ये त्याची स्क्रिप्ट बदलली जाणार आहे.

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय